ताज्या घडामोडी
साखर कारखान्याचा अपेक्षीत भाव मिळत नसल्या मुळे शेतकरी अडचणीत

साखर कारखान्याचा अपेक्षीत भाव मिळत नसल्या मुळे शेतकरी अडचणीतो
आसू दि : श्रीराम सह.साखर कारखाना ही आपली मातृसंस्था आहे.ती टिकली पाहिजे ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची भावना आहे.किंबहुना शेतकरीही वाचला पाहिजे ही कारखानदारांची भावना असली पाहिजे.मात्र राजकीय आणि सहकारातील निर्णयामुळे शेतकऱ्यांना कारखानदारांकडून अपेक्षित दर मिळत नाही.परिनामि शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.अशा स्थितीत अजूनही आम्हाला श्रीरामकडून १५० ते २०० रूपये मिळतील अशी अपेक्षा आहे.त्यासाठी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आणि संचालक यांनी आमची मागणी लाऊन धरून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी आशी खर्डेकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित पाडवा वाचन कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.त्यास शिवरूपराजे यांनी दुजोरा देत आपण प्रयत्नशील असल्याचे ग्वाही देऊन श्रीरामला ऊस घालण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
आसू ता.फलटण येथे दरवर्षीप्रमाणे खर्डेकर कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी पाडवा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीमंत दिव्यांजलीराजे खर्डेकर, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, श्रीमंत डॉ.संयुक्ताराजेखर्डेकर, श्रीमंत
सिद्धसेनराजे खर्डेकर,
एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे या उददेशाने दरवर्षी खर्डेकर कुटुंबियांच्या वतीने पाडवा वाचन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यातून तालुक्यासह पूर्व भागातील लोकांनी खूप प्रेम दिले.ऊस दर निश्चिती बाबत आपण कमी पडलो असल्याची खंतही श्रीमंत शिवरूपराजे यांनी व्यक्त केली.उसदराबाबत कोल्हापूर आणि फलटणची परिस्थिती वेगळी आहे.त्यामुळे दोन दिवसांत कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करु असे सांगितले.
दुसऱ्या हप्त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू.श्रीराम आणि शेतकरीही टिकला पाहिजे यासाठी श्रीरामला. ऊस घालण्याचे आवाहन केले.यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ऊसाची लागवड करा असे आवाहन श्रीमंत शिवरूपराजे यांनी केले.
येथे बाराबलुतेदार गुण्या गोविंदाने राहत आहेत.मराठ्यांना कोणाचेही आरक्षण काढून नको,तर कायदेशीर मार्गाने मिळावे ही मागणी असल्याने आरक्षणाच्या लढाईत सर्वांनी साथ दिली.त्यामूळे मी सर्वांसाठी साथ देणार.जातीवादाला आजिबात थारा नाही.आसू,गोखळी गण आणखी गुणवरे गटात राजकारणात खुल्या प्रवर्गातील आरक्षित जागेवरही अन्य प्रवर्गाला संधी देण्याची परंपरा आहे. या परिसरात कोणता ही निर्णय घेण्याचा ठरल्यास सर्वजन एकत्र बसून जो निर्णय ग्रामस्थांन मधून होईल त्यालाच संधी दिली जाते.यातून खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळते आहे.सद्या पवारवाडी येथे १३ कोट रूपये खर्चून उत्तम आरोग्याच्या दृष्टीने दवाखान्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्रीमंत शिवरूपराजे यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले .
महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असतानाही महिलांना मागे राहू देऊ नये. त्यांना समाजापुढे आणण्याची आजही गरज आहे. सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्यांच्याकडे विचार करण्याची मोठी शक्ती आहे. त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी अधिक करून घेणे गरजेचे आहे. पुण्याच्या सक्षम नारी संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करु शकतो. येथून पुढील होणार्या सामाजिक कार्यक्रमात महिलांची उपस्थिती वाढली पाहिजे असे आवाहन श्रीमंत डॉ.संयुक्ताराजे खर्डेकर यांनी यावेळी केले.
या वेळी ,शिवाजी शेडगे , संतोष खटके, संतोष शेंडगे आदिनी आपली मनोगत व्यक्त केले.
यावेळी आसू,पवारवाडी,गोखळी,गुणवरे, निंबळक,हणमंतवाडी, जाधववाडी,शिंदे नगर आदी गावातील आणी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.