ताज्या घडामोडी

सासवडचा जग्वार ए.बी.पी.मॉल हा एक लँडमार्क प्रोजेक्ट ठरेल : आमदार संजय जगताप

Spread the love

सासवडचा जग्वार ए.बी.पी.मॉल हा एक लँडमार्क प्रोजेक्ट ठरेल : आमदार संजय जगताप
आसू : आंतरराष्ट्रीय दर्जांच्या सेवा सुविधांनी युक्त असा शिवजल ग्रुप निर्मित भव्य जग्वार ए.बी.पी.मॉल हा सासवड सह पुरंदर तालुक्याच्या वैभवात नक्कीच भर घालेल.भविष्यात जग्वार ए.बी.पी.मॉल हा एक लँडमार्क प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाईल असा आशावाद पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.
सासवड ता.पुरंदर,जि.पुणे येथील जग्वार ए.बी.पी.मॉलच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते,सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे,व्ही.एन.एस.तथा शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले आदी प्रमुख मान्यवर उपास्थित होते.
बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की,फलटण येथील शिवजल ग्रुप म्हणजे हक्काची सावली देणारी माणसं अशी त्याची ओळख आहे.या ग्रुपच्या माध्यमातून उभा राहत असलेला भव्य असा ए.बी.पी.जग्वार मॉल यामुळे सासवडकरांची लाईफस्टाईल बदलण्यास नक्की मदत होईल.या मॉलमध्ये विविध ब्रँडचे शॉप,प्ले झोन एरिया,फूड कोर्ट, मल्टिप्लेक्स सिनेमा हॉल आणि प्रमुख आकर्षण म्हणजे एरोप्लेन हॉटेल थीम या गोष्टींमुळे हा मॉल सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.त्यामुळे पुरंदर तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल.लोकांना वेगळं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न या ग्रुपचा असतो.तसाच एक नवीन संकल्पना घेऊन उभा राहत असलेला हा प्रकल्प नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाला उद्योग व्यवसाय करता येत नाहीत असे म्हणतात,पण याला अपवाद ठरला आहे शिवजल ग्रुप.शिवजल ग्रुपच्या माध्यमातून पुणे मुंबई येथे नाही असा आणि दुबई सारख्या ठिकाणी ज्या पध्दतीचे मॉल आहेत, त्या पध्दतीचा मॉल या ठिकाणी होतोय ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
त्यामुळे हा मॉल इथल्या भूमीचे हे एक आबुषण ठरणार आहे हे निश्चित.त्याबरोबरच याठिकाणी अनेक विकासाच्या गोष्टी होतील असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
गोरगरीबांना ५ लाख घरे देणे,एक हजार उद्योजक निर्माण करणे,दहा हजार लोकांना रोजगार मिळवून देण्याबरोबरच एक कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट हाती घेतल्याचे संस्थापक शिवजल ग्रुपचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.ॲड रितेश सावंत यांनी आभार मानले.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!