फलटणमधील दोन मित्रअपघातात ठार
टिप्परची दुचाकीला जोरदार धडक; फरांदवाडी येथील घटना
आसू दि: १६ आळंदी-
पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर
तांबमळा (फरांदवाडी, ता. फलटण)
गावच्या हद्दीत टिप्परने दुचाकीला
समोरून जोरदार धडक दिली. यात
दुचाकीवरील दोन मित्र ठार झाले. अमिर
ताजुद्दीन शेख (वय ३२ रा. शुक्रवार पेठ,
फलटण) व गणेश सुनील लोंढे (वय
३५ रा. मंगळवार पेठ, फलटण) अशी
त्यांची नावे आहेत. कुटुंबातील कर्ते
पुरुष गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत
आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस
ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की,
अमिर शेख व गणेश लोंढे हे मंगळवारी
मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास
दुचाकीवरून (एमएच ११ सीपी ४७७८)
फलटणकडे येत होते. ते तांबमाळ
(फरांदवाडी) येथे आले असता भरधाव
लोणंदकडे निघालेल्या दहाचाकी टिप्पर
(एमएच ०९ एफएल ६०८८) समोरून
जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील
अमिर शेख व गणेश लोंढे या मित्रांचा
मृत्यू झाला. याप्रकरणी टिप्पर चालक
अमित साह ललनसाह (मूळ रा. ग्रामपोस्ट
दरम्यान कटराकला,थाना मोहानिया,जि.कैमूर भभुऑ, बिहार,सध्या या.धुळदेव,ता.फलटण ) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद जमशेद दादा मिया पठाण वय 47 राहणार शुक्रवार पेठ फलटण यांनी दिली असून तपास पोलीस अध्यक्ष उपनिरीक्षक सुरज शिंदे करीत आहेत दरम्यान अमीर शेख व गणेश लोंढे हे दोघेही कुटुंबातील कर्ते होते.त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरकोसळला आहे. अमिर शेख हे बिर्याणी हाऊस चालवीत होते तर गणेश लोंढे याचा चायनिजचा गाडा होता. दोघांचाही मोठा मित्रपरिवार आहे.