गावठीकटटा, दोन जिवंत काडतुस व चोरीची पल्सर मोटार सायकलसह एक जणाला लोणंद येथे पोलीसांनी केले जेरबंद
खंडाळा : निरा जवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पैसे न देता पळून जाणाऱ्या एका संशयीताला लोणंद येथे जेरबंद केले असून त्याच्याकडून गावठीकटटा , दोन जिवंत काडतुस व चोरीची पल्सर मोटार सायकल लोणंद पोलीसांनी हस्तगत केली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधून आज शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार थोपटेवाडी ता . पुरंदर जिल्हा पुणे येथील नम्रता सव्हिस स्टेशन नावचे पेट्रोल पंपावर आरोपीत गणेश सुभाष चव्हाण (वय २९ रा.बेगमपुर ता.मोहोळ जि.सोलापुर) याने पल्सर मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरुन चोरीच्या उददेशाने पैसे न देता निरा ते लोणंद जाणारे रोडने पोबारा केला असता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. तो लोणंद येथील जुना फलटण रोडवर आला असल्याची माहीती लोणंद पोलीसांना मिळताच लोणंद पोलीसांनी सदर आरोपीत याला ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली व दोन पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचा कटटा ( अग्निशस्त्र) , दोन जिवंत राऊंड , एक चाकु व एक पल्सर मोटार सायकल मिळुन आली असून यातील पल्सर मोटार सायकल ही सहकारनगर पोलीस ठाणे, पुणे येथून चोरीस गेली असून त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोणंद पोलीसांनी सदर आरोपीत याला अटक केली असून त्याचेकडे मिळुन आलेल्या गावठी कटटयाबाबत लोणंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर , पोलीस उप – निरिक्षक गणेश माने यांचेसह पोलीस हवालदार संजय जाधव , पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक , पो हवा महेश सपकाळ , अविनाश नलवडे, पोलीस कॉस्टेबल शिवाजी सावंत , संतोष नाळे , गोविंद आंधळे , केतन लाळगे , श्रीनाथ कदम , आविनाश शिंदे , फैय्याज शेख , सागर धेंडे, अमोल पवार, विठठल काळे यांनी कारवाईत भाग घेतला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार विष्णु गार्डे हे करीत आहेत.