खाजगी बँका कार्यालयीन कामकाजाबाबत जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी
सातारा दि. 19 (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने दि. 30 एप्रिल पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहतील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.