फलटण तालुक्यातील 10 गावे मायक्रो कंटेंटमेंट व बफर झोन घोषित : प्रांताधिकारी
फलटण : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी फलटण तालुक्यात निर्बंध वाढविणे आवश्यक असताना फलटण तालुक्यातील 10 गावे मायक्रो कंटेंटमेंट व बफर झोन म्हणून घोषित केली असल्याचे आदेश प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी काढले आहेत.
फलटण तालुक्यातील 10 गावे मायक्रो कंटेंटमेंट व बफर झोन म्हणून आज सोमवार दि. 19 एप्रिल रोजी घोषित केली असून यामध्ये निंबळक आळजापूर आदर्की बुद्रुक विठ्ठलवाडी वडले सोनवडी खुर्द तांबवे मठाचीवाडी घाडगेवाडी व खुंटे यांचा समावेश असून 10 गावे मायक्रो कंटेंटमेंट व बफर झोन म्हणून डॉ. जगताप यांनी घोषित केली आहेत.
मायक्रो कंटेंटमेंट व बफर झोन म्हणून निंबळक येथील संपूर्ण निंबळक गावठाण धुमाळवस्ती इवरे वस्ती शिंदे वस्ती बोडरे वस्ती वाजेगाव – निंबळक धनगरवस्ती बोडकेवस्ती बनकर वस्ती व निंबळक नाका, आळजापूर येथील पतसंस्था परिसर प्रथमेश कषी सेवा केंद्र परिसर व शिंदे आळी, आदर्की बुद्रुक येथील संपूर्ण गावठाण परिसर, विठ्ठलवाडी येथील विठ्ठलवाडी गावठाण परिसर खालची व वरचीआळी ग्रामपंचायत परिसर तरडगांव रोड दत्तमंदिर बोडकेआळी व बनकरआळी, वडले येथील वडाचामळा, सोनवडी खुर्द येथील शिंदे वस्ती, तांबवे येथे तांबवे गावठाण बौध्द मंदिर परिसर, मठाचीवाडी येथील शेलारमळा धनवडेवस्ती मठाचीवाडी गावठाण, घाडगेवाडी येथे घाडगेवाडी गावठाण भोसले वस्ती अलगुडेवाडी – सासवड रोड व खुंटे येथील खुंटे गावठाण हनुमाननगर पाटील वस्ती हनुमंत भोंगळे ते रामचंद भोंगळे वस्ती हा परिसर मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून डॉ. जगताप यांनी घोषित केला आहे.
तर निंबळक आळजापूर आदर्की बुद्रुक विठ्ठलवाडी वडले सोनवडी खुर्द तांबवे मठाचीवाडी घाडगेवाडी व खुंटे ही फलटण तालुक्यातील 10 संपूर्ण गावे बफर झोन म्हणून डॉ. जगताप यांनी घोषित केली आहेत.
फलटण तालुक्यातील 10 गावांमध्ये सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दूध व भाजीपाला सेवा सुरु राहणार असून या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी इतर अत्यावश्यक वस्तू नागरीकांना पोहोच करणेचे नियोजन त्यांचे स्तरावर करावे. गावातील हॉस्पिटल व मेडिकल या सेवा नियमानुसार सुरु राहणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.