फलटण शहरात विनाकारण फिरणाऱ्या 15 नागरीकांची रॅपिड टेस्टमध्ये 1 जण पाॅझिटीव्ह 

Spread the love
फलटण : येथील पिरॅमिड चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या १५ नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असता त्यामध्ये १ जण पाॅझिटीव्ह आढळून आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवार दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान पिरॅमिड चौक येथे फलटण नगर नगरपरिषद व फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट केली असता यावेळी एकूण १५ नागरिकांची रॅपिड टेस्ट केली त्यामध्ये १ जण पॉझिटिव्ह मिळून आला आहे. पॉझिटिव्ह मिळून आलेल्या व्यक्तीला काॅरंटाईन केंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरीकांची रॅपिड टेस्ट केली जाणार असल्याने कोणीही विनाकारण अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरण्याचे बंद करावे असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण नगर परिषद यांचेवतीने करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!