आदर्की बुद्रुक येथे एकाने महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल
फलटण: आदर्की बुद्रुक ता. फलटण गावच्या हद्दीत
निखिल हॉटेलसमोर एकाने विनयभंग केल्याची तक्रार एका ३५ वर्षीय महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
याबाबत लोणंद पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ९.३०वाजण्याच्या सुमारास आदकी बुद्रुक ता. फलटण गावचे हद्दीत
निखिल हॉटेलसमोर संतोष सखाराम सूळ (रा. खराडेवस्ती आदर्की बुद्रुक ता. फलटण) याने ३५ वर्षीय महिला निखिल हॉटेलसमोर झाडू मारत असताना त्याठिकाणी टाटा छोटा हत्ती गाडी घेऊन आला व तू माझ्याबरोबर चल असे म्हणून शरीरसुखाची मागणी करून तिचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. महिलेला त्याच्या गाडीकडे जबरदस्तीने ओढत असताना
त्या महिलेने विरोध केल्याने त्याने तिला शिवीगाळ केल्याची तक्रार लोणंद पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे.
याबाबत सहाय्यक फौजदार भोसले अधिक तपास करीत आहेत.