शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Spread the love
सातारा : (जिमाका): शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार असून नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही तरी नागरिकांनी वैध कारण असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
शनिवार व रविवार बाहेर फिरण्यावर बंदी असून वैध कारणाने बाहरे पडल्यास नागरिकांना कारण विचारण्यात येणार आहे.  अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या ज्या बाबी आहेत शनिवार व रविवारी सुद्धा शासनाने ठरवून दिलेलया नियमानुसार सुरु राहणार आहेत. दि. 30 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा जमावबंदी आदेश आठवड्याच्या 7 दिवसांसाठी लागू राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगही 7 दिवस सुरु राहणार आहेत. शिफ्टमध्ये काम करतात अशा उद्योगातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीचे फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे त्यांना शनिवार व रविवारी कामावर जाण्यासाठी अडविणार नाही. रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरु होती मात्र शनिवारी व  रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही परंतु रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देता येऊ शकते. ई-कॉमर्स, शेती संबंधित कामे यांना बंधने नाहीत. लग्न समारंभासाठी तहसीलदार याची परवानगी घ्यावी. 50 पेक्षा जास्त लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये. कोणी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत अशा दुकानदांरानी यापुर्वी जसे सहकार्य केले होते त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर प्रोटॉकॉलप्रमाणे करावा
रेमडेसिवीरचे औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसिवीरचे औषध द्यावे. जिल्ह्याला  रेडिमसवीरचा पुरवठा 100 टक्के होईल व रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यतातून प्रयत्न करीत आहोत.  रेमडेसिवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसिवीरच औषध देतील. रेमडेसिवीरच्या औषधासाठी  लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून निरासण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!