फलटण व खंडाळा तालुका क्राईम बातम्या

Spread the love
पिंप्रद येथे सापडला बेवारस मृतदेह
फलटण : पुणे – पंढरपूर रोडवर  असणाऱ्या शिवराज पेट्रोल पंपाशेजारी पिंप्रद ता. फलटण गावचे हद्दीत येथे एक बेवारस मृतदेह सापडला आहे.
याबाबत पिंप्रद गावचे पोलीस पाटील सुनील बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे – पंढरपूर रोडवर  असणाऱ्या शिवराज पेट्रोल पंपाशेजारी पिंप्रद ता. फलटण गावचे हद्दीत येथे सापडलेला एक बेवारस मृतदेह पिंप्रद गावचा नसून बाहेरचा आहे. सदर मृत व्यक्ती सायकलवर फिरून कात्री, चाकू, विळी वगैरे वस्तूंना धार लावण्याचे काम करीत असावा असा अंदाज त्याच्याजवळ असणारी सायकल व अवजारे पाहून ग्रामस्थ यांनी व्यक्त केला आहे.
बेवारस व्यक्तीचे मृत्यूचे करण समोर आले नाही मात्र फलटण तालुक्यातील कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने अजूनही त्या मृतदेहाजवळ कोणी धजावत नाही. बेवारस व्यक्ती पिंप्रद येथे मयत झाली असून सदर व्यक्तीला कोणी ओळखीत असल्यास फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पळशी येथे अज्ञात चोरट्याने मोटार सायकल नेली चोरुन

खंडाळा : घराच्या पाठीमागे लावलेली मोटार सायकल पळशी ता. खंडाळा येथून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनमधून दिलेली माहिती अशी मोटार सायकल मालक साळुंखे (रा. पळशी ता. खंडाळा) यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल क्रमांक (एम एच 11 सीएल 9638) घराचे पाठीमागे  लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरुन नेल्याची फिर्याद दाखल केली आहे.याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे अधिक तपास करीत आहे.

भांडणे सोडविण्यास गेला असता एकाला विटेने मारहाण : गुन्हा दाखल
खंडाळा : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या एकाला केसुरडी ता. खंडाळा येथे विटेने मारहाण करण्यात आली असून कंटेनर चालकाविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनमधून दिलेली माहिती अशी सांगली येथील कंपनीमध्ये डांबर खाली करुन मुंबई येथे चालक मोहमद वकील अहमद शेख ( रा. वडाळा मुंबई) हे टँकर घेवून निघाले असता केसुरडी ता. खंडाळा गावचे हद्दीत हाँटेलवर जेवणासाठी थांबले असता एक कंटेनर चालक व चालक शिवराम सुखदेव यांच्यात बाचाबाची सुरु असताना मोहमद शेख हे भांडणे सोडविण्यास गेले असता राहुल भिकाजी माने (रा. ढगिरेवाडी ता. माण) याने शिवीगाळ करुन वीटेने डोक्यात मारुन शेख यांना जखमी केले. सोबत असणारे यांनी शेख यांना हाताने मारहाण केली. याबाबत शिरवळ पोलीस यांना माहिती मिळाली असता लगेच तेथे जावून कंटेनर चालक राहुल माने याला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिरवळ येथे विनाकारण फिरताना 5 जणांवर व 2 हाँटेल चालकांवर गुन्हे दाखल

खंडाळा : शासकीय नियमांचा भंग करुन  विनाकारण फिरत असताना शिरवळ येथील 5 जणांवर व दोन हाँटेल चालकांवर शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या वेळी जाहीर केलेल्या संचारबंदी आदेशाचा व नियमांचा भंग करुन शिरवळ येथील परिसरात किरण पद्माकर देशपांडे मोशीन शौकत बागवान मोफीज रज्जाक शेख योगेश जयकर साळुंखे व अक्षय अशोक गायकवाड हे विनाकारण फिरत असताना सापडल्याने 5 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत हाँटेल वेलकम बिर्याणी हाऊस हे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विनाकारण सुरु असताना व त्यावेळी 4/5 जेवण करताना निदर्शनास आल्याने मालक विशाल मोहन गायकवाड यांच्या विरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 महामार्गालगत हाँटेल मराठी बाणा विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने मालक कौशल राजेंद्र देशमुख यांच्या विरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार संतोष मठपती व नवनाथ कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.
शिरवळ परिसरात शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी पोलुस हवालदार नवनाथ कोळेकर हे रात्रगस्त घालीत असताना सदरची कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!