फलटण तालुक्यातील ६ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर : डॉ. शिवाजीराव जगताप
फलटण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यात गेले काही दिवसांत वाढून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. फलटण तालुक्यातील कोळकी, साखरवाडी, झिरपवाडी, जोरगाव, वाठार निंबाळकर व जाधववाडी ही ६ गावे खबरदारीचा उपाय म्हणून कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी काढले केले आहेत.
फलटण तालुक्यातील कंटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावांमध्ये हॉस्पिटल व मेडिकल सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहणार असून सकाळी ६ ते ९ या वेळेत फक्त दूध व भाजीपाला या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कंटेंटमेंट झोन व बफर झोन करिता असलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
Tags
क्राईम न्युज फलटण