शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी लोणंद येथे दोन जणांवर गुन्हा 

Spread the love

लोणंद : येथील लोणंद नगरपंचायतीची गेल्या  6 वर्षापासुन थकीत असलेली घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्यास सांगावयास गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करून व गेटला कुलुप लाऊन अटकाऊन ठेऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील एस टी स्टॅन्डजवळ रहात असलेले बाबुलाल खोडीदास शहा यांचे रहाते घर क्रमांक 1778 यांच्या घराची घरपट्टी व पाणीपट्टी मागील 6 वर्षापासुन थकीत असल्याने त्यांना कर भरण्यास सागंण्यासाठी लोणंद नगरपंचायतीचे कर्मचारी गेले असता  बाबुलाल खोडीदास शहा, अभय बाबुलाल शहा (दोघे रा . लोणंद ता.खंडाळा) यांनी शिवीगाळ करुन अंगावर येवून विजय रघुनाथ बनकर, रामदास बाजीराव तुपे, शिवाजी रामचंद्र शेळके (रा. लोणंद ता. खंडाळा) यांना  धक्काबुक्की केली व त्यांच्या रहाते घराचे कंपाऊडच्या लोखंडी गेटला कुलूप लावुन अटकावून ठेवून शिवीगाळ करुन दमदाटी करुन बाहेर जाण्यास अटकाव करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये  शिवाजी शेळके यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर बाबुलाल शहा, अभय शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरिक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.

मुख्य कार्यकारी संपादक

सध्या डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले असून आम्ही फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. Phaltan Rakshak digital portal वर आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन जिल्हा, राज्य देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक क्षेत्रातील बातम्या वाचू शकता. संपर्क - E-mail : phaltanrakshak@gmail.com वेबसाईट : https:// phaltanrakshak.in संपादक, फलटण रक्षक डिजिटल पोर्टल ------------------------------------------------- साप्ताहिक फलटण रक्षक - नानासाहेब मुळीक - संपादक, कार्यकारी संपादक - विनायक शिंदे, उपसंपादक - अशोक सस्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!