निंबळक गावचा कारभार लोकाभिमुख करण्याचा मानस : उद्योजक राम निंबाळकर
फलटण : निंबळक येथील ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीची सत्ता चौथ्यांदा निमजाईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या ताब्यात दिली आहे. लोकांनी विकासाला प्राधान्य दिले असून लोकांच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देऊन गावचा कारभार लोकाभिमुख करण्याचा मानस असल्याचे उद्योजक राम निंबाळकर यांनी सांगितले. 

निंबळक ता. फलटण येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, गुणवरे गावचे उपसरपं प्रा. रमेश आढाव, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम, माजी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, भाभा संशोधन केंद्र मुंबई येथील शामराव भोईटे, मुंबई जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष किशोर पाटणकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, शाम निंबाळकर, अमर निंबाळकर, तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष जयराम मोरे, शेरेशिंदेवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पिसाळ, काशिराम मोर उपस्थित होते.
आरोग्य, पाणी, स्वच्छता, शिक्षण याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. निंबाळक ग्रामस्थांनी आपल्या पॅनेलवर दाखविलेला विश्वास निश्चित सार्थ ठरविला जाईल. गेल्या १५ वर्षात अनेक विकास कामे निंबळक गावात करण्यात आली असून पुढील काळात देखील विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल याची ग्वाही उद्योजक राम निंबाळकर यांनी दिली.
निंबळक गावच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असून निंबळककरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो आणि पुढेही राहणार असल्याचे निमजाईदेवी टस्ट्रचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी केले आहे.
निंबळक येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरांचा येत्या काही दिवसांत जिर्णोध्दार करण्याचा मानस असून निंबळक गावच्या ग्रामस्थांना बरोबर घेऊन या मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे राम निंबाळकर यांनी सांगितले.
गाव पातळीवर आमच्या गटाचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत. इतर निवडणूकीत आमच्या गटातील कार्यकर्त्यांनी कोणाला मदत करायची तो त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांना त्याबाबत व्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याचे राम निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच राजेंद्र मदने, उपसरपंच सौ. जयश्री जयराम मोरे, सदस्य विकास भोसले, सदस्या सौ. गौरी भगवान ढमाळ, सौ. मंगल बाळू चव्हाण, सौ. सुनिता सागर बुधावले, सौ. वर्षा कैलास रिटे, सौ. सिमा शिवाजी बनकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उद्योजक राम निंबाळकर यांनी सोलापूर – विजापूर रस्त्याचे २५ कि.मी. काम फक्त २४ तासात पूर्ण केल्याबद्दल निंबळक ग्रामस्थांच्यावतीने हार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, मा. नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, शामराव भोईटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक समाधान कळसकर यांनी केले तर शेवटी अमोल बनकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमा दरम्यान पक्षीय विषय निघाला असता आपण आजतागायत कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून आपण फक्त आपल्या व्यावसायाला प्राधान्य देतो असे राम निंबाळकर यांनी सांगितले.