फलटण येथील मोरेश्वर शिक्षण संस्थेचे हनुमंत मोरे यांचा डायमण्ड पुरस्काराने गौरव
फलटण : मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था फलटणचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे यांना अखिल भारतीय खेल महासंघातर्फे सामाजिक व क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय स्थरावरील प्रतिष्ठित मानला जाणारा डायमण्ड पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले आहे.
बारामती येथे आयोजित केलेल्या समारंभात हनुमंत मोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय खेल महासंघ दिल्ली सन्मन्वयक व निरीक्षक, अखिल भारतीय खेल महासंघ महाराष्ट्र यूनिट प्रमुख अशिष डोईफोडे, जागतिक चॅम्पियन बॉडी महेंद्र चव्हण, बिल्डर सुवर्ण पदक विजेते सतीश ननवरे आर्यनमॅन (3वेळा), सौ. कल्याणी चौधरी सुप्रसिद्ध अभिनेत्री (लागिर झालं जी फेम)
या मान्यवरांच्य हस्ते हनुमंत मोरे मामा यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी सामाजिक, राजकीय व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Tags
क्राईम न्युज