चाकूचा धाक दाखवून १० हजार रुपयांचा जबरदस्तीने चोरुन नेलेला मोबाईल व संशयित ताब्यात
फलटण : फलटण बारामती रोडवरील सोमवार पेठ येथील पेट्रोल पंप येथे मोटार सायकल अडवून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला होता. फलटण शहर पोलीसांनी तपास करुन संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाइल व चाकू जप्त केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार रमेश रामचंद्र शिंदे (रा. बिरदेवनगर जाधववाडी ता. फलटण मूळ राहणार मायणी ता. खटाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश शिंदे हे दि 16 जानेवारी 2021 रोजी रात्री 8.15 वाजता फलटण बारामती रोडवरील सोमवार पेठ फलटण येथील पेट्रोल पंप पाठीमागे बारामती रोडवर बारामती येथून फलटणकडे टीव्हीएस स्टार सिटी मोटर सायकलवरून येताना त्यांना 19 ते 20 वर्षे वयोगटातील अनोळखी मुलगा तोंडाला मास्क व चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला व त्याचे उजव्या हाताचे मनगट ते कोपरा येथे बाहेरील बाजूला इंग्रजीमध्ये TUSHAR असे गोंदलेल्या दिसले. मला त्याने हातातील चाकूचा धाक दाखवून माझ्या कडील 10 हजार रुपये किमतीचा पर्पल रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला असल्याची फिर्याद दिली आहे.
फलटण शहर पोलीसांनी तपास केला असता संशयित तुषार उर्फ गद्या संजय ननावरे (रा. आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 10 हजार रुपये किंमतीचा पर्पल रंगाचा विवो कंपनीचा मोबाइल व चाकू जप्त करण्यात आला आहे.
रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा. द. वि. कलम 392 नुसार फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
Tags
आरोग्य व शिक्षण