लहुजी विद्रोही संघटना सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील विजयनाना घोलप यांची तर फलटण तालुका अध्यक्षपदी विनोद लोखंडे यांची नियुक्ती
फलटण : लहुजी विद्रोही संघटना सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते विजयनाना घोलप यांची नियुक्ती करण्यात आली तर फलटण तालुका अध्यक्षपदी विनोद लोखंडे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

लहुजी विद्रोही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भास्कर नाना शिंदे व महाराष्ट्र राज्याच्या सचिव ॲड. पुजाताई देडे यांच्या उपस्थितीत सातारा विश्रामगृह येथे संघटनेची बैठक पार पडली. 

लहुजी विद्रोही संघटना सातारा जिल्हा अध्यक्षपदी विजयनाना घोलप यांची तर फलटण तालुका अध्यक्षपदी विनोद लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
लहुजी विद्रोही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भास्करनाना शिंदे व राज्य सचिव ॲड. पुजाताई देडे यांनी माझ्यावर सोपविलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून सातारा जिल्ह्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लहुजी विद्रोही संघटना सातारा जिल्हाध्यक्ष विजयनाना घोलप यानी दिली.