नीरा खोऱ्यातील साखर कारखान्यांचे डिसेंबरअखेर २७ लाख ९५ हजार ७४० मे. टन गाळप आणि २९ लाख ८५ हजार ६९० क्विंटल साखर उत्पादन
फलटण : नीरा खोऱ्यातील काही प्रमुख साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात डिसेंबर अखेर २७ लाख ९५ हजार ७४० मे. टन ऊसाचे गाळप आणि २९ लाख ८५ हजार ६९० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने (श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण) ६४ दिवसात १ लाख ९४ हजार ५३३ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे, सरासरी साखर उतारा ११.२९ % राहिला असून २ लाख १८ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी ६० दिवसात १ लाख ८७ हजार ९२० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.३० % राहिला असून २ लाख ७ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ६१ दिवसात ४ लाख ६९ हजार ६७९ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.२० % राहिला असून ४ लाख ६८ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ६६ दिवसात ३ लाख ८८ हजार ६८५ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ % राहिला असून ३ लाख ९७ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ६५ दिवसात ४ लाख ६० हजार २८ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.११ % राहिला असून ३ लाख ९७ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ५८ दिवसात २ लाख ४४ हजार ६८० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.२१ % राहिला असून २ लाख ४७ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ५१ दिवसात ४ लाख १४ हजार ९१० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५७ % राहिला असून ४ लाख ८६ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ५२ दिवसात ४ लाख ०५ हजार ५०० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.३७ % राहिला असून ४ लाख ७८ हजार २७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ५५ दिवसात ८३ हजार ८०५ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.६५ % राहिला असून ८३ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
जवाहर सहकारी साखर कारखाना लि., हुपरी, जि. कोल्हापूरने ६३ दिवसात ७ लाख ६४ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.६४ % राहिला आहे. साखर उत्पादन ८ लाख २ हजार १०० क्विंटल झाले आहे.